योगी आदित्यनाथांच्या राज्यारोहणाचा अर्थ आणि अनर्थ
आदित्यनाथांची योग्यता, पात्रता, त्यांची वादग्रस्त वक्तव्यं यांबद्दल माध्यमांनी अनेकदा लिहून झालं आहे. बहुमतानं राज्य मिळवलेल्या भाजपला या प्रतिक्रियांची काळजी करण्याचं कारण नाही आणि हा पक्ष कुणाला किंमत देणार नाही, हेही खरं. मात्र या निर्णयानं देशाच्या राजकारणावर होणारे परिणाम मात्र दूरगामी असणार, हे नक्की. देशातील सगळ्यात मोठ्या राज्यातील कारभार कोण हाकणार, यावर उत्तर भारतातील राजकारण अवलंबून असतं........